ग्रामपंचायत नानिवली

२०११ च्या जनगणनेनुसार नानिवली गावाची एकूण लोकसंख्या सुमारे ३,२८८ असून त्यामध्ये पुरुषांची संख्या १,६६७ तर महिलांची संख्या १,६२१ आहे. गावात सुमारे ५९१ कुटुंबे वास्तव्यास आहेत. या गावामध्ये अनुसूचित जमाती (ST) समाजाचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असून पारंपरिक संस्कृती, सण-उत्सव आणि लोकजीवन आजही जपलेले आहे. शेती हा येथील प्रमुख व्यवसाय असून भातशेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. याशिवाय काही लोक मजुरी, बांधकाम कामे व लघुउद्योगांमध्येही कार्यरत आहेत.

शिक्षणाच्या दृष्टीने पाहता गावात प्राथमिक व माध्यमिक शाळांची सुविधा उपलब्ध आहे, मात्र एकूण साक्षरता दर सुमारे ४७% असल्याने शिक्षण क्षेत्रात अजून सुधारणा होण्याची गरज आहे. विशेषतः महिलांच्या साक्षरतेचे प्रमाण वाढवण्यासाठी विविध शासकीय योजना राबवल्या जात आहेत. गावात वीज, पाणीपुरवठा, रस्ते, मोबाईल नेटवर्क आणि काही प्रमाणात इंटरनेट सुविधा उपलब्ध आहेत, ज्यामुळे गावाचा हळूहळू विकास होत आहे.

लोकसंख्येची माहिती

 
क्रमांकक्षेत्रतपशील
एकूण लोकसंख्या
3288
पुरुष लोकसंख्या
1667
महिला लोकसंख्या
1621
०–६ वर्षे वयोगटातील लोकसंख्या
 
अनुसूचित जाती (SC %)
 
अनुसूचित जमाती (ST %)
 

उपलब्ध पायाभूत सुविधा

क्रमांकसुविधा प्रकारउपलब्ध (होय/नाही)संख्यारस्त्याने जोडलेले (होय/नाही)
ग्रामपंचायत कार्यालयहोयहोय
प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC)होय होय 
उपकेंद्र (Sub Center)नाही 

नाही 
अंगणवाडीहोय

होय
प्राथमिक शाळाहोयहोय
माध्यमिक शाळाहोयहोय
उच्च माध्यमिक शाळानाही 0नाही  
महाविद्यालय / व्यावसायिक केंद्रनाही 0नाही 
समुदाय भवन (Community Hall)नाही 0नाही
१०स्वस्त दर दुकान (PDS)होय1होय
११श्मशानभूमी / स्मशानभूमीहोय4नाही
१२इंटरनेट / मोबाईल टॉवरहोय1नाही
१३सीएससी केंद्र (CSC Center)होय1होय

प्रशासकीय संरचना

ग्रामपंचायत बँक माहिती

खाते नाव: नानिवली

बँकेचे नाव : दी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.

शाखेचे नाव: ग्रामपंचायत नानिवली 

अकाउंट नंबर : 005100300000155

आई एफ एस सी कोड : TDCB0000051

पत्ता : मु. नानिवली, ता-जि-पालघर